इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर येथे आज महायुतीचा मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाला नागपूर येथे सुरुवात होणार आहे. त्याअगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. या सोहळ्यात ३९ मंत्र्यांनी शपथ देण्यात आली. त्यात भाजपच्या १९ शिवसेनेचे ११तर राष्ट्रवादीचे ९ मंत्री यांनी आज शपथ घेतली. नाशिकमधून शिवसेनेकडून दादा भुसे तर राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवाळ व माणिकराव ठाकरे यांनी शपथ घेतली. नाशिकच्या या तिन्ही मंत्र्यांचा परिचय बघा.