नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हयात आज ७ डिसेंबर २०२४* पासून १०० दिवसीय क्षयरोग शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. त्याचा जिल्हास्तरीय शुभारंभ सिविल हॉस्पिटल नाशिक येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे मार्गदर्शनानुसार,सहाय्य संचालक डॉ विजय डेकाटे कुष्ठरोग क्षयरोग विभाग पुणे, यांच्या मार्गदर्शनानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाची जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा राबविण्यात आला. याप्रसंगी उपसंचालक नाशिक मंडळ नाशिक डॉ कपिल आहेर (सहाय्यक उपसंचालक नाशिक मंडळ नाशिक) डॉ योगेश चित्ते (जिल्हा शल्यचिकित्सक), डॉ चारुदत्त शिंदे (जिल्हा आरोग्य अधिकारी),
डॉ सुधाकर मोरे (जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी), जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ रवींद्र चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ रवींद्र चौधरी यांनी या कार्यक्रमाची संपूर्णपणे प्रस्तावना केली. यामध्ये टीबी सारखा आजार लवकरात लवकर ओळखून त्यावर उपचार होणे गरजेचे आहे यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे तसेच टीबी झालेल्या रुग्णांना नियमित उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करणे त्यांच्या आहारासाठी समाजातील घटकांनी पुढे येणे हे अत्यंत गरजेचे आहे केंद्र सरकारने १०० दिवसाचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून समाजामध्ये या आजाराविषयी जनजागृती करणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवले आहे तसेच समाजामधील दाट वस्ती असलेल्या भागांमध्ये विशेष शोध मोहीम घेऊन रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे, त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे असे याप्रसंगी प्रस्तावनामध्ये आपले विचार मांडले तसेच याप्रसंगी डॉ चारुदत्त शिंदे यांनी टीबी या आजारावर शासकीय रुग्णालयामध्ये अत्यंत मोफत आणि दर्जेदार उपचार केला जातो त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवावा व जास्तीत जास्त रुग्ण शोधून काढून त्यांना उपचाराखाली आणावे आरोग्य विभागातील आशा, आरोग्य सेवक, सेविका , तसेच समाजातील अनेक संस्था यांनी सक्रिय सहभाग दाखवून ही मोहीम यशस्वी करावी असे आवाहन केले.