नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदेच विराजमान व्हावेत यासाठी माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृवाखाली जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज बारा ज्योतींलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील महादेव मंदिरात दुग्धाभिषेक केला. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्र्यांनी लोकाभिमुख निर्णय घेत अनेक योजनांच्या माध्यमांतून राज्यातील गोर-गरिबांना दिलासा दिल्याने पुन्हा एकनाथ शिंदे यांचीच मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी असे साकडे शिवसैनिकांनी त्र्यंबकराजाला घातले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला कधी न०हे इतके मोठे यश मिळाले आहे.आता राज्यच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागते याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे. भाजपा, शिवसेना यापैकी मुखमंत्रीपद नेमके कुणाला द्यायचे याचा निर्णय लवकरच दिल्लीत घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध लोकाभिमुख निर्णय घेवून शेतकरी,कष्टकरी,महिलांसह सर्वसामान्यांना न्याय दिल्यानेच विधानसभा निवडणूकीत महायुतीला बहूमत मिळालेले असल्यानेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा शिंदे यांचीच वर्णी लागावी अशी भावना तमाम शिवसैनिकांची आहे.
यातून माजी खा. हेमंत गोडसे यांच्या नेतृवाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर येथील महादेव मंदिरात दुग्धाभिषेक केला.यावेळी सहसंपर्क प्रमुख गणेश कदम, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सदानंद नवले, शिवाजी भोर, त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष भूषण अडसरे, तालुकाध्यक्ष रवि भोये,संपत चव्हाण , गणेश चव्हाण,रवि वारूंगसे, पप्पू मेढे, कुंडलिक जमधडे, मनोहर महाले,अंकुश परदेशी आदी मान्यवरांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.