नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्री छगन भुजबळ यांचे अभिष्टचिंतन केले. मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीद्वारे व सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी भुजबळ फार्म येथील कार्यालय आमदार दिलीप बनकर, आमदार माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, आमदार सीमा हिरे, मुंबई अध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,जयवंतराव जाधव, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष ऍड.नितीन ठाकरे, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष ऍड.सुभाष राऊत, राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख,बाळासाहेब कर्डक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,पंढरीनाथ थोरे, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने,गोरख बोडके, प्रा.बाळासाहेब पिंगळे, डॉ.कैलास कमोद, सुधाकर बडगुजर, नाना महाले, आनंद सोनवणे, कैलास मुदलीयार, नवनाथ वाघमारे, प्रा.दिवाकर गमे, दत्ता गायकवाड,मोहन शेलार,माजी सभापती किसनराव धनगे, वसंत पवार,भाऊसाहेब भवर, डी.के.जगताप, डॉ.श्रीकांत आवारे, समाधान जेजुरकर, प्रेरणा बलकवडे, योगिता आहेर, कविताताई कर्डक,प्रा.ज्ञानेश्वर दराडे,पूजा आहेर,अंबादास खैरे, मनीष रावल, प्रा.रमेश औसर, एल.जी.कदम, अविनाश वाकचौरे, संतोष वीरकर, पी.एम.सैनी,संपत वाघ, दिपक लोणारी, मंगेश गवळी, सचिन दरेकर, तानाजी आंधळे, प्रा.अर्जुन कोकाटे, बाळासाहेब पुंड, संजय खैरनार, दिपक गायकवाड, विजय पाटील, रतन हलवर, अरुण पाटील, विनोद शेलार, काशिनाथ गायकवाड, अशोक संकलेचा, ज्ञानेश्वर शेवाळे, गोटू मांजरे, राजेंद्र शिंदे, दत्तूपंत डुकरे, पार्वतीताई शिरसाठ, राजेंद्र जगझाप, आशा भंदुरे, डॉ.प्रवीण बुल्हे, भूषण लाघवे, आबा खोत, किरन झोडगे, देवकी शिंदे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
एमईटी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून विशेष कार्डची भेट
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एमईटी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विशेष शुभेच्छा कार्ड बनवून मंत्री छगन भुजबळ यांना भेट दिले. यावेळी शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने ७७ डझन वह्यांचे वाटप
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्या निमित्त मुंबई प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ, दिलीप खैरे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी क्रेनच्या सहाय्याने २५ फूट पुष्पहार व शाल, फेटा घालत ढोल ताशांच्या गजराने जंगी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जमा केलेल्या ७७ डझन वह्यांचे वाटप मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गरजू शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले.
शुभेच्छा म्हणून मिळालेल्या वह्यांचे होणार गरजू विद्यार्थ्याना वाटप
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी वाढदिवसानिमित्त शाल, बुके न आणता वह्या पुस्तके शुभेच्छा म्हणून द्यावे असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मान्यवरांनी त्यांना वह्या आणि पुस्तके दिली. या मिळालेल्या वह्यांचे गरजू विद्यार्थ्याना वाटप करण्यात येणार आहे.