नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा टप्पा- २ मध्ये नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील केंद्र क्रमांक १६ मधील महानगरपालिका शाळा क्र.८६ ( मुली ) , पाथर्डीगाव , नाशिक शाळा ठरली राज्यातील ‘ अ’ व ‘ ब ‘ वर्ग महानगरपालिका गटामध्ये विभाग स्तरावर राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या शाळेस १५ लाखाचे बक्षीस दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते NCPA, नरिमन पॉइंट, मुबई येथे प्रदान करण्यात येणार आहे.
या स्पर्धेतील उत्तुंग यशाने नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उंचावले आहे. याकरीता विभागीय आयुक्त श्री. प्रवीण गेडाम ,नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, मनपा शिक्षणाधिकारी बी.टी.पाटील आणि ईश्वर चव्हाण केंद्रप्रमुख यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
नाशिक महानगरपालिकेच्या या शाळेने सदर स्पर्धेसाठी विद्यार्थी गुणवत्ता वाढी सोबतच सर्वच क्षेत्रांमध्ये गेल्या दोन वर्षात भरीव कामगिरी केली आहे. शालेय भौतिक /पायाभूतसुविधा,विद्यार्थी शैक्षणिक संपादनूक ,शासकीय ध्येय धोरणाची अंमलबजावणी करीता १५० गुणांची ही स्पर्धा होती.त्यात या शाळेने विभाग स्तरावर पुणे महापालिकेनंतर आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. सदर आभियानाची मूल्यमापन प्रक्रिया ५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत पूर्ण करण्यात आली होती.
या कामी मुख्याध्यापक विलास दांडगे यांच्या नेतृत्वाखाली श्री पद्माकर बागड ,सौ कविता पाटील, श्रीमती संगीता येवला, श्रीमती अंजली तांबे , श्री रामदास तळपे,श्री. सुनील वाघ सौ लीला चौरे ,श्री नरहरी बोरसे, श्रीमती वंदना आहेर ,श्री मनोज वळवके श्री योगेश वायखिंडे, श्रीमती हेमलता पवार, श्रीमती शैला बोरसे ,श्री हिलाल जगदाळे श्रीमती उषा पगारे ,श्रीमती भारती चौधरी, श्रीमती संगीता अहिरे, श्रीमती अनिता लोहार, श्री शशिकांत केदार, श्री मनोज बच्छाव व श्री कारभारी देवरे यांच्यासह सर्व पालक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.