नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण दरम्यान झालेल्या स्फोटात दोन अग्निवीरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तोफेचा बॅाम्बगोळा फुटल्याने हा भीषण अपघात घडला. या घटनेत गोहिल विश्वराज सिंग (२०), सैफत शीत (२१) यांचा मृत्यू झाला.
गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अग्निवीरांची एक तुकडी शिंगवे बहुला येथे फायरिंग रेंज या ठिकाणी तोफेचा सराव करण्यासाठी गेली. यावेळी इंडियन फिल्ड गन क्र.४ मधून अग्निवीरांच्या चमून बॅाम्बगोळा फायर केला असता त्याचा तोफेजवळ स्फोट झाला. यामुळे बॅाम्बचे शेल उडून या अग्निवीरांच्या शरीरात शिरले. त्यात दोघांचा मृत्यू झाला.
नाशिक शहरात देवळाली कॅम्प येथे स्कुल ऑफ आर्टिलरीचे शिंगवेबहुला फायरिंग रेंज आहे. अग्निवीर नाशिकरोड तोफखाना केंद्रात भरती होऊन तेथे त्यांचे लष्करी प्रशिक्षण सुरु आहे.