सुदर्शन सारडा, नाशिक
नाशिक – नाशिकच्या उड्डाणपूलावर मोटारसायकल चालविण्यास बंदी असूनही सर्रास त्या नेल्या जात आहे. यामुळेच जीव धोक्यात घालून वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करत आहे. ही कारवाई पोलीस आणि दुचाकीस्वार यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.
मुंबई – आग्रा असलेल्या या महामार्गावर नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यात या महामार्गावर सर्वात मोठा उड्डानपूल नाशिक शहरातून जातो. ब-याच वेळा लवकर इच्छितस्थळी पोहचण्यासाठी दुचाकी वाहनधारक उड्डानपूलाचा वापर करतात. पण, ते धोक्याचे असते. त्यामुळे पोलिसांनी आता धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पण, ही कारवाई थेट उड्डाणपुलावर केली जात असल्यामुळे पोलिसांची जीव सुध्दा धोक्यात आहे. कारण या उड्डापूलावर येणारी वाहने प्रचंड स्पीडने येत असतात. त्यामुळे ही कारवाई सुध्दा उड्डानपूल उतरतांना केली तर ते सहज शक्य आहे.