बुधवार, ऑक्टोबर 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा पाठपुरावा….भामरे मिसळ ते रणभूमी रस्ता विकासाला सव्वा कोटी मंजूर

सप्टेंबर 23, 2024 | 8:05 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240923 WA0320 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कर्मयोगीनगर येथील रणभूमी ते भामरे मिसळ हा रस्ता विकसित करण्यासाठी महापालिका महासभेने सोमवारी मान्यता दिली. यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या सतत अडीच वर्षांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. महापालिका प्रशासनाचे नागरिकांनी आभार मानले आहेत.

नाशिकच्या प्रभाग क्रमांक २४ मधील बडदेनगर ते पाटीलनगरला जोडणारा कर्मयोगीनगरमधील रणभूमी क्रिकेट मैदान ते खोडे मळ्यातील भामरे मिसळ रस्ता विकसित करावा, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने गेल्या दोन वर्षांपासून करण्यात येत होती. आयुक्तांना वेळोवेळी निवेदने दिल्यानंतर यासाठी महापालिका अर्थसंकल्पात सव्वा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, त्यासाठीचा प्रस्ताव तयार करून त्यास मंजुरी द्यावी, यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. अखेर सोमवारी, २३ सप्टेंबर २०२४ च्या महासभेत या कामाचे एक कोटी २४ लाख ७२ हजार रुपयांचे प्राकलन मंजूर करण्यात आले. कर्मयोगीनगर येथील परमानंद अॅकॅडमीजवळ बॉक्स कल्व्हर्ट अर्थात छोटा पूल व संरक्षक भिंत बांधून हा रस्ता विकसित करण्यात येणार आहे.

यामुळे गोविंदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. नवे, जुने सिडको, कालिका पार्क, कर्मयोगीनगर, बडदेनगर, पांगरे मळा, खांडे मळा, तिडकेनगर, जगतापनगर, उंटवाडी आदी भागातील रहिवाशांची सोय होणार आहे. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, विठ्ठलराव देवरे, भालचंद्र रत्नपारखी, बाळासाहेब देशमुख, दिलीप निकम, बापूराव पाटील, मनोज पाटील, मनोज वाणी, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, अनंत संगमनेरकर, बाळासाहेब राऊतराय, शैलेश महाजन, बाळासाहेब तिडके, मगन तलवार, भारती देशमुख, मीना टकले, वंदना पाटील, रूपाली मुसळे, दीपक दुट्टे, राहुल काळे, सतीश मणिआर, सचिन राणे, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर, हरिष काळे, प्रथमेश पाटील आदींनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.

IMG 20240923 WA0319
IMG 20240923 WA0318

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बदलापुर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू….पोलिसांची बंदूक हिसकावून स्वत:वर झाडल्या गोळ्या

Next Post

या व्यक्तींचे अनपेक्षित खर्च वाढतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ सप्टेंबरचे राशिभविष्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
मुख्य बातमी

बंपर दिवाळी भेट… एकाचवेळी ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती… बघा संपूर्ण यादी…

ऑक्टोबर 20, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा लक्ष्मीपूजनाचा दिवस… जाणून घ्या, मंगळवार, २१ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 20, 2025
rape
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरात महिला विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ… या तीन ठिकाणी गुन्हे दाखल…

ऑक्टोबर 20, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

आज आहे लक्ष्मीपूजन! असे आहे मुहूर्त… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 20, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अनपेक्षित खर्च वाढतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ सप्टेंबरचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011