नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा माहेश्र्वरी सभा व डॉ.श्रीकांत करवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार २२ सप्टेंबर रोजी प्राथमिक शाळा,इस्पितळ,विद्यार्थी भवन व वृद्धाश्रमाचे भूमिपूजन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.या समारंभास
अखिल भारतीय माहेश्र्वरी महासभेचे अध्यक्ष संदीप काबरा यांची विशेष उपस्थिती असेल अशी माहिती प्रकल्प प्रमुख उमेश मुंदडा यांनी दिली.
नाशिक जिल्हा माहेश्र्वरी महासभा आणि डॉ. श्रीकांत करवा फाऊंडेशन तर्फे नाशिक येथे सुमारे पंधरा एकर जागेत सुसज्ज शैक्षणिक संकुल,वृध्दाश्रम व इस्पितळाचे भूमिपूजन रविवारी सकाळी साडे अकरा वाजता स्वामीनारायण हॉल येथे संपन्न होईल. सदर कार्यक्रमास पालकमंत्री दादा भुसे, छगन भुजबळ,डॉ. श्रीकांत करवा, रामनिवास मानुधने,डॉ. संजय मालपाणी, प्रभावती मुंदडा, शोभना बुब, पुरुषोत्तम लोहिया,दिगंबर झंवर, सविता राठी,सुरेश केला,हिरालाल मालू,अशोक बंग,शरद राठी, शरद करवा रामेश्वर करवा,राजेश राठी,प्रकाश लढ्ढा, आशिष राठी,राजेश मालपाणी,पुरुषोत्तम हेडा, माणकचंद काबरा,विनोद जाजू,सतीश चरखा,जुगलकिशोर लोहिया यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.भूमिपूजन सोहळ्या बरोबरच ऋणनिर्देश सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष दिनेश मुंदडा, सुरेश नावंदर,नयना हेडा, आशिष कलंत्री यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.
सहा मान्यवरांचा ओम बिर्ला यांच्या हस्ते सन्मान
महेश जीवन गौरव पुरस्कार स्व. प्रदीप बुब यांना घोषित झाला असून महेश कर्मवीर पुरस्कार ज्येष्ठ सनदी लेखापाल अशोक झंवर(नाशिक), ब्रिजलाल बाहेती (मालेगाव),
पुरुषोत्तम काबरा (येवला), प्रकाशचंद कलंत्री ( नांदगाव),रामकिसन करवा( सिन्नर) व नंदलाल भुतडा ( त्रंबकेश्वर) या जिल्ह्यातील सहा मान्यवरांना बिर्ला यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.