नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरात गणेशोत्सवाच्या विसर्जन सर्वत्र शांततेत व सुरळीत सुरु असतांना दुसरीकडे वालदेवी नदीत गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या घटनेबाबत सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही. पण, या घटनेत पाथर्डी रोडवरील समर्थनगर येथील म्हाडा कॅालनी जवळ असलेल्या साई अव्हेन्यू इमारतीतल राहणा-या स्वयंम भैया मोरे (२४) व ओमकार चंद्रकांत गाडे (२३) या तरुणांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक मदतीसाठी धावले. पण, या तरुणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.