नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. दुपारी दोनच्या सुमारास शहरात जोरदार पावसाला सुरवात झाली. जवळपास तासभर चाललेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. शहरातील पंचवटी, अशोक स्तंभ तसेच द्वारका, नाशिकरोड परिसरात मुसळधार पाऊस पडत होता. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या मुसळधार पावसाने शहरातील भाजीविक्रेत्यांची त्रेधातिरपीट उडाली. या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. जोरदार पावसामुळे उंचसखल भाग, अतीखोलगट भागात पाणी साचल्याने दिसून आले.