नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या बागलाण मधील शिवकालीन असलेल्या आणि सर्वात उंच असेलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींनी पावन असलेल्या साल्हेर येथील किल्ल्याला युनोस्कोच्या यादीत स्थान मिळाले आहे. सुरतेची लूट करुन छत्रपती शिवाजी महाराज काही दिवस साल्हेर किल्ल्यावर थांबले होते.
त्यामुळे शिवाजी महाराजांच्या आठवणी जतन व्हाव्या आणि अनेक वर्षां पासून ताठ मानेने उभ्या असलेल्या या गड किल्ल्याची ऐतिहासिक मोहर उमटवण्याचा प्रयत्न सुरु होता. त्याचाच एक भाग म्हणून युनोस्कोच्या यादीत महाराष्ट्रातील साल्हेरसह अकरा व तामिळीलनाडूतील जिंजी या किल्ल्याची यादी युनेस्कोच्या जागतिक यादीत नामांकनासह पाठविण्यात आली होती. या यादीतील प्रस्तावासाठी नाशिकच्या बागलाण मधील साल्हेर किल्ल्याचा समावेश असल्याने नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अधिका-यासह किल्ल्याला भेट देत पाहणी केली. तर पुढील महिन्यात युनेस्कोची टीम येथे येऊन पाहणी करणार आहे.