नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उघड्या मोबाईल शॉपीमधून चोरट्यांनी रिपेअरींगसाठी आलेले हॅण्डसेट चोरून नेले. ही घटना आडगाव येथे घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेत सुमारे ३० हजार रूपयांचे जुने वापरते मोबाईल चोरट्यानी चोरून नेले असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहसीन याकुब शेख (रा.जुम्मा मस्जिदजवळ आडगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेख यांचे आडगाव गावात रझा एटन्टरप्रायझेस नावाचे मोबाईल विक्री व दुरूस्तीचे दुकान आहे. मंगळवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास शेख अल्पशा कामानिमित्त दुकान सोडून परिसरात गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी दुकानात दुरूस्तीसाठी आलेले सुमारे ३० हजार रूपये किमतीचे पाच मोबाईल चोरून नेले. अधिक तपास हवालदार वाघ करीत आहेत.