नाशिक – गेल्या अनेक दशकांची असलेली नाशिककरांची प्रतिक्षा आता संपुष्टात येणार आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत नाशिकला विमानसेवा सुरू झाली आहे. मात्र, आता नव्या वर्षात या सेवेला नवे पंख फुटणार आहेत. सद्यस्थितीत नाशिक-पुणे, नाशिक-बेळगाव, नाशिक-नवीदिल्ली आणि नाशिक-अहमदाबाद या सेवा सुरू आहेत. नव्या वर्षात त्यात मोठी भर पडणार आहे. आघाडीची विमानसेवा कंपनी स्पाईसजेटने त्यांच्या उन्हाळी वेळापत्रकात नाशिकसाठी नवे मार्ग जोडण्याचे निश्चित केले आहे. हे सर्व मार्ग या कंपनीला उडान योजनेतच मंजूर करण्यात आलेले आहेत.
जानेवारीत गोवा
जानेवारी महिन्यात नाशिकहून गोवा ही सेवा सुरू होणार आहे. तसे, पत्र स्पाईसजेट कंपनीने केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाला दिले आहे. त्यामुळे वर्षारंभीच ही सेवा नाशिककरांसाठी उपयुक्त ठरणार आहे. देशातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ या सेवेमुळे नाशिकशी कनेक्ट होणार आहे.
मार्चपासून या सेवा
स्पाईसजेट कंपनीने प्रस्तावित केलेल्या उन्हाळी वेळापत्रकानुसार, मार्चपासून नाशिकमधून नव्या सेवा सुरू होणार आहेत. त्यात नाशिक-बंगळुरू, नाशिक-हैदराबाद आणि नाशिक-नवी दिल्ली या थेट सेवांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या सर्व सेवा आठवड्यातील सर्व दिवस देण्याचा कंपनीचा मानस आहे.
परिणामी हे होणार
मार्चमध्ये नव्या सेवा सुरू झाल्यानंतर नाशिक विमानतळावर प्रवाशांची प्रचंड रेलचेल राहणार आहे. स्पाईसजेटची नाशिक-बंगळुरू, नाशिक-नवी दिल्ली, नाशिक-गोवा आणि नाशिक-हैदराबाद, अलायन्स एअरची नाशिक-अहमदाबाद, नाशिक-नवी दिल्ली, नाशिक-पुणे, स्टार एअरची नाशिक-बेळगाव, ट्रुजेटची नाशिक-अहमदाबाद या सेवा सुरू राहतील. म्हणजेच, नाशिक विमानतळावर दिवसाला ९ विमानांचे लँडिंग आणि टेकऑफ होणार आहे.
या कंपन्यांचाही विचार
केंद्र सरकारच्या उडान योजनअंतर्गत नाशिक-सिंधुदुर्ग, नाशिक-चेन्नई, नाशिक-भोपाळ, नाशिक-हिंदण(दिल्ली) या सेवाही संबंधित कंपनींना मंजूर करण्यात आलेल्या आहेत. त्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. या सेवांपैकी काही सेवा २०२२मध्ये सुरू होण्याची चिन्हे आहेत.
उद्योग, पर्यटन, व्यवसायाला चालना
विमानसेवा वाढल्याने नाशिकच्या उद्योग, पर्यटन आणि व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे. मुंबई विमानतळावर असलेला लोड सुद्धा नाशिक विमानतळामुळे कमी होण्याची चिन्हे आहेत. भारतातील प्रमुख शहरांसाठी सुरू झालेली सेवा ही उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागाला नाशिककडे आकर्षित करणार आहे.
स्पाईसजेट कंपनीचे प्रस्तावित वेळापत्रक असे