नाशिक – शहरातील हेल्मेट सक्तीबाबत आता पोलिस आय़ुक्त दीपक पाण्डेय यांनी कठोर निर्णय घेतला आहे. जर तुम्ही विनाहेल्मेट वाहन चालवित असाल तर याची दखल आता तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. शहरात १ डिसेंबरपासून नव्या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार, शहरात कुठेही विना हेल्मेट दुचाकी चालक सापडले तर त्यांना दंड केला जाणार नाही. तर, त्यांची थेट परीक्षा घेतली जाणार आहे. सर्वप्रथम त्यांचे समुपदेशन केले जाणार असून त्यांची १० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात उत्तीर्ण होणाऱ्यांनाच वाहनाची चावी परत दिली जाणार आहे. तर, जे वाहनचालक नापास होतील त्यांना थेट दोन तासांचे समुपदेशन केले जाणार आहे. आयुक्तांनी हे आदेश काढले असून त्याची अंमलबजावणी १ डिसेंबरपासून केली जाणार आहे. आयुक्तांनी काढलेले आदेश असे