नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, एनडीसीए प्रोफेशनल लीग २०२२-२३चा थरार १५ ते १८ जून दरम्यान रंगणार आहे. नाशिकमधील ८ संघांत , एन डी सी ए च्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब व महात्मा नगर क्रिकेट मैदानावर सदर स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
पुढील आठ संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत :
१ एव्हरशाईन ए बी
२ मराठा वॉरीअर्स
३ स्ट्राईकर्स
४ आर्किटेक्टस इलेवन
५ सनराइज
६ स्माशर्स
७ एव्हरशाईन विराट आणि
८ नाशिक कोचेस
या स्पर्धेत नाशिक मधील डॉक्टर्स ,आर्किटेक्टस, सीए, वकील ,बिल्डर्स ,इंजिनिअर्स ,उद्योजक , व्यावसायिक असे विविध प्रोफेशन मध्ये काम करणारे खेळाडू सहभागी होणार आहेत.
गुरुवार १५ जून रोजी सकाळी आठ वाजता , हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर एव्हरशाईन ए बी विरुद्ध मराठा वॉरीअर्स तर महात्मा नगर क्रिकेट मैदानावर स्ट्राईकर्स विरुद्ध आर्किटेक्टस इलेवन असा या एन डी सी ए प्रोफेशनल लीग २०२२-२३ स्पर्धेचा शुभारंभ होत आहे.
सर्व क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर म्हणजे या स्पर्धेचे थेट – live – प्रक्षेपण स्पोर्टवोट, मुंबई तर्फे करण्यात येणार आहे. स्पोर्टवोट हे अँप डाउनलोड करून हजारो क्रीडाप्रेमींनी या सामन्यांचा थेट आनंद घेता येईल. नुकत्याच संपन्न झालेल्या हकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेद्वारे स्पोर्टवोटच्या थेट प्रक्षेपणाने सुवर्ण महोत्सवी वर्षात, एनडीसीएचा ऐतिहासिक डिजिटल अध्याय सुरु झाला व हजारो क्रीडाप्रेमींनी या सामन्यांचा थेट आनंद घेतला. तसाच या एन डी सी ए प्रोफेशनल लीग स्पर्धेचाही सर्वांनी आनंद घ्यावा असे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटने तर्फे आवाहन करण्यात येत आहे.
Nashik NDCA Professional League