नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस नाशिक सोशल मिडिया प्रमुख प्रफुल्ल पुंडलिक पवार हे कारसह बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी त्यांची पत्नी मयुरी पवार यांनी गंगापूररोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
मयुरी पवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रफुल्ल पवार हे ३० मार्च रोजी पासून बेपत्ता आहेत. गुरुवार, ३० मार्च रोजी सकाळी ते सिन्नर येथे गेले. त्यानंतर त्यांनी दुपारच्या सुमारास सांगितले की, ते तातडीने पक्षाच्या कामासाठी मुंबईला जात आहेत. त्यानंतर त्यांचा घरच्यांशी काहीही संपर्क झालेला नाही. ते घरी काहीही न सांगता नाशिक येथून निघून गेले आहेत. स्वतःची पांढऱ्या रंगाची रेनौल्ट कंपनीची किगर कार क्रमांक MH15HQ3958 व पुढील काचेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे घड्याळ असे चिन्ह आहे. तरी कोणाला काही माहिती मिळाल्यास त्वरित गंगापूर रोड पोलिस स्टेशन नाशिक (दूरध्वनी क्रमांक : ०२५३ २३०५२४२) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पवार यांच्या पत्नी, आई, वडील आणि मुलगी हे संपूर्ण कुटुंबिय चिंतेत आहेत. तर, पक्षातही सध्या अस्वस्थतेचे वातावरण आहे. सिन्नर येथून पवार हे नक्की कुठे गेले, त्यांच्याबाबत काही घातपात झाला का, यासह अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. पोलिस यासंदर्भात तपास करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1642845427891589120?s=20
Nashik NCP Youth Media Cell Chief Missing