नांदगाव ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यात काल ट्रॅक्टर चोरीची घटना घडलेली असतांना जळगाव-बुद्रुक येथील शेतकरी सुदाम आहिरे यांच्या शेतातील गोठ्यातील जवळ पास २५ ते २७ शेळ्या अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुदाम आहिरे यांचा शेळी पालनाचा व्यवसाय असून त्यांनी आपल्या शेतात छोटेसे पत्र्याचे शेड तयार करुन त्यात लहान-मोठ्या अशा २५ ते २७ शेळ्या पाळल्या होत्या. काल मध्य रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शेडचे कुलीप तोडून सगळ्या शेळ्या पायी चालवत डोंगर पार करत त्या कसारी घाटा पर्यंत नेल्या. तेथून त्या वाहनातून नेल्या असल्याचा अंदाज वर्तविला असून याप्रकरणी नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या सर्व शेळ्यांची किंमत १ लाख ७६ हजार रुपये असल्याच शेतक-याने सांगितलय.
Nashik Nandgaon Crime Goat Theft Police