औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत नाशिक विरुद्ध नांदेड हा सामना रंगला. नाशिकला पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळाले आहेत. हा सामना अनिर्णित ठरला आहे. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे यासर शेखच्या नाबाद १४२ धावा.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए सिनियर इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात, नाशिक ने नांदेड संघाविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळविले. सलामीवीर कर्णधार यासर शेख च्या दमदार नाबाद १४२ , तसेच मुर्तुझा ट्रंकवाला ने फटकेबाज व धनंजय ठाकुरनेही नाबाद अर्धशतक झळकवल्यामुळे नांदेडच्या २७० धावा नाशिक ने केवळ ५३ षटकांत ३ गड्यांच्या बदल्यात आरामात पार केल्या. निर्णायक विजयासाठी प्रयत्न करण्याच्या हेतूने आघाडी घेऊन पहिला डाव लगेच घोषित केला . पण खराब सुरुवाती नंतर नांदेडच्या फलंदाजांनी दुसर्या डावात ३ बाद ९९ अशी मजल मारल्यामुळे सामना अनिर्णीत अवस्थेत संपला . नांदेडतर्फे कर्णधार शमशुझामा काझी ने पहिल्या डावात शतक व दुसर्या डावात नाबाद अर्धशतक केले.
संक्षिप्त धावफलक व निकाल असा:
नांदेड – नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी – पहिला डाव – सर्वबाद २७० ( ८४.४ षटके ) – शमशुझामा काझी ११८, यश यादव ५४. तन्मय शिरोडे , तेजस पवार व यासर शेख प्रत्येकी २ तर मनीष कातकाडे व मुर्तुझा ट्रंकवाला प्रत्येकी १ बळी.
नाशिक – पहिला डाव – ३ बाद २७१ ( ५३ षटके ) डाव घोषित – यासर शेख नाबाद १४२ , मुर्तुझा ट्रंकवाला ५७, धनंजय ठाकुर नाबाद ५३.
नांदेड – दुसरा डाव – ३ बाद ९९ ( १८ षटके ) – शमशुझामा काझी नाबाद ६७ . तन्मय शिरोडे २ तर तेजस पवार १ बळी.
सामना अनिर्णीत . नाशिकला पहिल्या डावातील आघाडीचे गुण .