नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत प्रक्रिया आज पार पडली. येत्या काही महिन्यातच महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी आज महिला आरक्षणाची सोडत प्रक्रिया पूर्ण झाली. दादासाहेब गायकवाड सभागृहात हा समारंभ झाला.
महापालिकेचे यंदा १३३ प्रभाग आहेत. त्यातील ६७ प्रभागांवर महिला आरक्षण राहणार आहे. त्यातील ४३ प्रभागात प्रत्येकी एक आणि एका प्रभागात २ अशा प्रमाणे ४५ महिलांचे आरक्षण आहे. तर उर्वरीत जागांच्या आरक्षणाची सोडत चिठ्ठी टाकून काढण्यात आली. ४४ प्रभागांमध्ये २ पुरुष आणि २ महिला असे आरक्षण आहे. अनुसुचित जातीसाठी १९ आणि अनिसुचित जमातीसाठी १० जागा राखीव आहेत. तर, महिलांसाठी १९ पैकी १० जागा राखीव आहेत. तसेच, अनुसुचित जमातीसाठी ६ पैकी ५ जागा महिलांसाठी राखीव आहेत. उर्वरीत ५२ सर्वसाधारण जागा महिलांसाठी राखीव आहेत.
अनुसूचित जाती महिला आरक्षण असे
अनुसूचित जमाती महिलांसाठी एकूण पाच जागा असून 7 ब अनुसूचित जमाती 11 ब अनुसूचीत जमाती थेट आरक्षित राखीव असतील. तर 02 अ, 04 अ, 34 ब या जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
अनुसूचित जमाती महिला आरक्षण असे
अनुसूचित जमाती महिलांसाठी एकूण पाच जागा असून 7 ब अनुसूचित जमाती 11 ब अनुसूचीत जमाती थेट आरक्षित राखीव असतील. तर 02 अ, 04 अ, 34 ब या जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
सर्वसाधारण महिला आरक्षण असे
नाशिक मनपा निवडणुकीमध्ये सर्वसाधारण महिलांच्या 12 जागेसाठी सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये 5 ब, 10 ब, 16 ब, 18 ब, 21 ब, 30 ब, 31 ब , 32 ब, 33 ब, 36 ब, 37 ब या प्रभागांत सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.