नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक पूर्व विभागातील मौजे वडाळा (सर्व्हे नं. ४९,५०) येथील डी.जी.पी. नगर परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोठी मोहीम राबवली. या कारवाईत रस्त्यालगत उभारलेली ३० अनधिकृत गाळे व पत्राशेड हटवण्यात आले.
ही मोहीम आयुक्त श्रीमती मनिषा खत्री यांच्या आदेशान्वये व अति. आयुक्त (३) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईदरम्यान उपआयुक्त (अतिक्रमण) श्रीमती सुवर्णा दखणे, नाशिक पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव, नाशिकरोड व नाशिक पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे, इंदिरानगर पोलिस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे, उपनगर पोलिस निरीक्षक भरत शिरसाठ, नगरनियोजन विभागाचे उप अभियंता सोनवणे, प्रविण थोरात, निलेश साळी, बांधकाम विभागाचे खेमचंद पवार, शाखा अभियंता संजय चौधरी, सहा. अधीक्षक राजेंद्र भोरकडे, वरिष्ठ लिपिक गुणवंत वाघ, क. लिपिक प्रविण बागुल, तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारी जीवन ठाकरे, निखिल तेजाळे, भगवान सुर्यवंशी, प्रभाकर अभंग व सहाही विभागातील अतिक्रमण कर्मचारी निर्मूलन वाहनांसह उपस्थित होते.
महापालिकेने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, अनधिकृत बांधकामे व विनापरवाना व्यवसाय स्वतःहून काढून टाकावेत; अन्यथा मनपाकडून कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर दैनंदिन कारवाई सुरूच राहील, असा इशारा अति. आयुक्त श्रीमती स्मिता झगडे यांनी दिला आहे.