नाशिक – महापालिकेतील कार्यरत कर्मचाऱ्यांना दिवाळी पावली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असलेली प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. महापालिकेतील पदोन्नतीचा निर्णय अखेर घेण्यात आला आहे. गट अ आणि ब मधील एकूण ३७ तर गट क आणि ड मधील एकूण ४९३ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे.
महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील पदोन्नतीच्या कोटयातील रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 54(1) मधील तरतुदीनुसार “कर्मचारी निवड समिती” गठीत करण्यात आलेली होती. कर्मचारी निवड समितीच्या दिनांक 05/01/2021 ते दिनांक 06/09/2021 या कालावधीत बैठका संपन्न झाल्या होत्या. मा.उच्च न्यायालयातील पदोन्नतीच्या व दिव्यांग आरक्षणाच्या याचिकांच्या अनुषंगाने राज्य शासनाने दिनांक 07 मे,2021 आणि दिनांक 23 जुलै,2021 रोजी दिलेल्या निर्देशांनुसार कर्मचारी निवड समितीने पदोन्नतीच्या शिफारशी केल्या होत्या. दिनांक 26/10/2021 व दिनांक 27/10/2021 रोजी महानगरपालिका आयुक्त यांनी कर्मचारी निवड समितीच्या बैठका घेऊन खालीलप्रमाणे पदोन्नत्या देणेस मान्यता दिलेली आहे. गट-क व गट-ड च्या पदोन्नती यादी (आदेश) नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून, गट-अ व गट-ब चे याद्या महासभेच्या मान्यतेनंतर प्रसिध्द करण्यात येतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
आकडेवारी अशी