नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महानगरपालिका हद्दीत वाहतुकीस अडथळा ठरणारे चौकाचौकात लावण्यात आलेले अनधिकृत फलक हटविण्यात येत आहेत. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने आणि अतिक्रमण विभाग उपायुक्त करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली अतिक्रमण विभाग सातत्याने मोहिम राबवित आहेत.
गेल्या दीड महिन्यात मनपाचे सहा विभाग मिळून एकूण २,३५२फलक हटविण्यात आले आहेत. त्यामध्ये जाहिरात बोर्ड, होल्डिंग, पोल बॅनर, झेंडे, पोस्टर्स, स्टॅण्ड बोर्ड यांचा समावेश आहे. संपूर्ण मार्च महिन्यात सर्वाधिक ८४५ अनधिकृत फलक सातपूर विभागात तर नाशिक पश्चिम मध्ये सर्वात कमी ४७ फलक हटविण्यात आले आहेत. तसेच १ एप्रिल ते १६ एप्रिल या पंधरवड्यात ५२१ अनधिकृत फलक हटविण्यात आले आहेत. त्यामध्ये नाशिक पूर्व मध्ये सर्वाधिक १२० फलक तर नाशिक पश्चिम विभागात कमी ३६ फलक हटविण्यात आले आहेत. संबंधित नागरिकांनी स्वत:हून अनधिकृत फलक, होल्डिंग काढून टाकावे अन्यथा अतिक्रमण पथकाद्वारे कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उपायुक्त (अतिक्रमण) करुणा डहाळे यांनी केले आहे.
मार्चमधील विभागनिहाय कारवाई
१ मार्च ते ३१ मार्च दरम्यान सहा विभागात १,८३१ अनधिकृत फलक हटविण्यात आले आहेत.
नाशिक पूर्व – ९०
नाशिक पश्चिम – ४७
नाशिक रोड – ५५२
नविन नाशिक – ९१
पंचवटी – २०६
सातपूर – ८४५
एकूण – १,८३१
एप्रिलमधील कारवाई
१ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान एकूण ५२१ अनधिकृत फलक हटवून कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक पूर्व – १२०
नाशिक पश्चिम – ३६
नाशिक रोड – ९५
नविन नाशिक – ८६
पंचवटी – ६८
सातपूर – ११६
एकूण – ५२१
Nashik Municipal Corporation Illegal Hoarding Banners Action