नाशिक – नाशिक महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लवकरच होणार आहे. याचअंतर्गत उद्या (मंगळवार, ३१ मे) आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. अनुसूचित जाती, जमाती महिला आणि सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षण निश्चित केले जाणार आहे. या सोडतीचा कार्यक्रम सकाळी १० वाजता भाभा नगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपणही केले जाणार आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण आरक्षण सोडतीचा हा कार्यक्रम पाहू शकता, असे महापालिकेने सांगितले आहे.
Facebook link :
https://fb.me/e/6xjFDs7fl
Youtube link
https://youtube.com/c/mynmc