नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील अंगणवाडी सेविका तसेच कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. त्यांच्या मानधनात वाढ होणार आहे. नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत अंगणवाडी सेविकांचे मानधन दोन हजार रुपये वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे बाबत आमदार देवयानी फरांदे यांनी पुढाकार घेऊन अंगणवाडी सेविका, मुख्य शिक्षिका तसेच मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याची आग्रही मागणी राज्य शासनाकडे केली होती. याबाबत नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना निर्देश देण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील केली होती. तसेच नुकत्याच झालेल्या पावसाळीअधिवेशनात राज्याच्या विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करताना अंगणवाडी सेविकांची परिस्थिती सरकारच्या समोर मांडलेली होती.
मुख्यमंत्र्यांच्या वतीने देण्यात आलेल्या उत्तरात मानधनात वाढ करण्यात येईल असे आश्वासन देखील देण्यात आलेले होते. आमदार देवयानी फरांदे यांची आग्रही मागणी. अंगणवाडी सेविकांची परिस्थिती याबाबत संवेदनशील पणे विचार करून नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांनी आज झालेल्या महासभेत सदर विषय सादर करण्याचे आदेश दिले होते. माननीय आयुक्त यांनी दिलेला आदेशाप्रमाणे आज महासभेने अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला व अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दोन हजार रुपयाची वाढ करण्यात आली.
आमदार देवयानी फरांदे यांचे मानले आभार
आमदार देवयानी फरांदे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिल्याबद्दल व त्यांचे मानधन वाढवून दिल्याबद्दल अंगणवाडी मुख्य सेविका व अंगणवाडी सेविका यांनी आज आमदार देवयानी फरांदे यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले.
Nashik municipal corporation anganwadi sewika mandhan
MLA Devyani Pharande