नाशिक – कोविड-१९ नियमांचे पालन होत नसल्याने ३१ डिसेंबरच्या दिवशी महानगरपालिकेच्या वतीने जोरदार कारवाई करण्यात आली आहे. मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या निर्देशानुसार, मनपाच्या पथकांनी शहरातील हॉटेल आणि वाईन शॉपची तपासणी करण्यात आली. कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी शहरातील नाशिक पश्चिम, पंचवटी, नवीन नाशिक, नाशिकरोड या भागातील विविध आस्थापनांवर कारवाई करून एक लाख साठ हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कोविड-१९ नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शहरातील आस्थापनांना सूचना दिलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनपाच्या वतीने ३१ डिसेंबरला झालेली कारवाई अशी
नाशिक पूर्व
हॉटेल व वाईन्स शॉप मध्ये सामाजिक अंतर न पाळल्या प्रकरणी प्रत्येकी दहा हजार रुपये अशी दंडात्मक कारवाई ५ अस्थापनांवर करण्यात आली आहे.तसेच दोन हॉटेल मध्ये तेरा जणांना विना मास्क आढळल्याने प्रत्येकी पाचशे रुपये दंड करण्यात आला. असून असे एकूण छपन्न हजार पाचशे रुपये दंडात्मक कारवाई मनपाच्या पथका कडून करण्यात आली आहे.
ना.रोड विभाग
पथकामार्फत विनामास्क फिरणाऱ्या/ कामकाज करणाऱ्या १२ व्यक्तींना र रु ६०००/ हॉटेल मध्ये सोशल डिस्टन्ट नियमाचे पालन न केल्याने २ हॉटेल आस्थापनाला १००००/र.रू एकूण दंड १६०००/रू.करण्यात आला.
नाशिक पश्चिम
रविवार कारंजा परिसरातील न्यू जयमाला प्लास्टिक दुकानातून शंभर किलो प्लास्टिक जप्त करून १० हजार रुपये दंड करण्यात आला तसेच कोविड १९ नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पस्तीस हजार रुपये करण्यात आला असा एकूण ४५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
पंचवटी विभाग
पंचवटी, म्हसरूळ व आडगाव पोलिस स्टेशन यांचे संयुक्त ३ पथकांमार्फत दि ३१/१२/२०२१रोजी पंचवटी विभागातील वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करणेत आली असून सदर कारवाई मध्ये विनामास्क, सामाजिक अंतर पालन न करणे, ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देणे इत्यादी बाबत उल्लंघन होत असल्याचे आधळून आल्याने विनामास्क ३६ केसेस, १८०००/-, सामाजिक अंतर पालन न करणे ३ केसेस २५०००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करणेत येऊन एकूण ३९ केसेस द्वारे र.रु.४३०००/- दंड वसूल करणेत आला आहे.