नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने नाशिक महापालिका आयुक्तपदी रमेश पवार यांची नियुक्ती केली होती. आता शिंदे सरकारने पवार यांची बदली केली आहे. पवार हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तथा मातोश्रीशी अतिशय निकटचे संबंध ठेऊन असल्याचे सांगितले जाते. पवार हे अनेक वर्षे मुंबई महापालिकेत कार्यरत होते. त्यामुळेच त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. नाशिक मनपा आयुक्तपदाची धुरा आता डॉ. चंद्रकांत पुलकुंडावर यांच्याकडे देण्यात आली आहे. ते शिंदे यांचे विश्वासू असल्याचे सांगितले जाते. पुलकुंडावर हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. उद्या किंवा परवा ते तातडीने आयुक्तपदाचा पदभार घेणार असल्याचे समजते.
Nashik Municipal Commissioner Transfer CM Shinde Decision