नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई – नाशिक महामार्गावर कसारा घाटा जवळ कंटेनरच्या धडकेत दोन जैन साध्वींचा मृत्यू झाला. महासती प.पू. श्री. सिद्धायिकाश्रीजी म.सा व प.पू. श्री हर्षायिकाश्रीजी म.सा ही मृत झालेल्या जैन साध्वींची नावे आहे. नाशिक येथील चातुर्मासाठी ते पायी येत असांना हा अपघात झाला.
या अपघातात कंटेनरने पिकअप आणि ओमनी कारला अगोदर धडक दिली. त्यानंतर पायी चालणाऱ्या जैन साध्वी यांना धडक दिली. पहाटे ५ वाजता हा अपघात हॅाटेल ऑरेंज सिटीजवळ झाला. या जैन साध्वींचा नाशिक येथील पवननगर येथील जैन स्थानकात चार महिने चातुर्मास होणार होता. त्यासाठी त्या येत असतांना ही दुर्घटना घडली. श्रमण संघीय सलाहकार श्री सुमतिप्रकाशजी म.सा. वाचनाचार्य प्रवर श्री विशाल मुनिजी म.सा. यांच्या या दोन्ही साध्वी सुशिष्या होत्या.
त्यांच्यावर आज दुपारी ४ वाजता अंतिम संस्कार व्दारका अमरधाम येथे विद्युत दाहिनीत केला जाणार आहे. पवननगर जैन स्थानक ते द्वारका पर्यंत त्यांची अंतिम यात्रा निघणार आहे.