नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभेवर मा. कुलपती व मा. प्रति-कुलपती यांच्याकडून विविध सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याबाबत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, मा. कुलपती कार्यालयाकडून प्राप्त आदेशानुसार तसेच विद्यापीठ अधिनियमान्वये अधिसभेवर सहा सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठाचे मा. प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण शिक्षण मंत्री यांच्याकडून राज्यातील प्रत्येक महसुल विभागातून एक प्रतिनिधी असे सहा सदस्यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. रमेश बैस यांच्या कडून विद्यापीठाच्या अधिसभेवर डॉ. पराग कांतिलाल संचेती, डॉ. अभय नारायण कुलकर्णी, डॉ. श्रीमती चेतना सुनिल गोरीवाले, डॉ. मीनल मोहन मोहगांवकर, डॉ. हेमलता राजेंद्र जळगांवकर व डॉ. गिरिष विठ्ठलराव ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच विद्यापीठाचे मा. प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडून कोकण विभागातून डॉ. विष्णु सी. बावणे, पुणे विभागातून डॉ. संतोष आर. गटणे, छत्रपती संभाजीनगर विभागातून डॉ. सचिन एस. उमरेकर, नाशिक विभागातून डॉ. विजय व्ही. भोकरे, अमरावती विभागातून डॉ. प्रसाद टी. बन्सोड आणि नागपूर विभागातून डॉ. आनंद ए. टेंभुर्णीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल सर्व सदस्यांचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प, मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मनःपुर्वक अभिनंदन केले आहे.
Nashik MUHS Health University Appointments