नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक महापालिकेच्या थकीत मालमत्ता करावर लावण्यात आलेल्या दंडावर सवलत योजना सुरु करण्याची मागणी शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती. या मागणीला यश मिळाले असून पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार महापालिकेने दंडावर ९५ टक्के पर्यंत सवलत जाहीर केली असल्याने हजारो नाशिककरांना त्याचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळेच प्रविण (बंटी) तिदमे यांनी पालकमंत्री दादा भुसे आणि महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.
नाशिक महानगरपालिका हद्दीतील नागरीकांना मोठया प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यात मालमत्ता करावरील असलेला दंड रक्कमेची भर पडत आहे. त्यामुळे नागरीकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यासाठी मालमत्ता करावरील दंड (शास्ती) माफीसाठी एक सवलत योजना (अमनेस्टी योजना) सुरु करण्याची मागणी शिवसेना महानगर प्रमुख तथा माजी नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती. सदर योजना सुरु केल्यास नागरीकांवरील आर्थिक भार कमी होण्यास हातभार लागेल व दिलासा मिळेल, अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती.
पालकमंत्री दादा भुसे यांच्या निर्देशानुसार महापालिकेने दंडावर ७५ ते ९५ टक्के पर्यंत सवलत जाहीर केली असल्याने हजारो नाशिककरांना त्याचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळेच प्रविण (बंटी) तिदमे यांनी पालकमंत्री दादा भुसे आणि महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत. लवकरच वाढीव करांचा बोजाही कमी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत नाशिकमध्ये घोषणा केली आहे.