नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. म्हसरुळ परिसरातील आधाराश्रमात तब्बल सहा मुलींवर बलात्कार झाल्याची घटना असताना आणखी एक संतापजनक गुन्हा समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी देवळाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळाली पोलिस स्टेशनमध्ये पोक्सो कायद्या अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने नुकताच नवजात बाळाला जन्म दिला आहे. पीडित मुलगी सध्या रुग्णालयात आहे. तिच्यावर उपचार केले जात आहेत. पीडित मुलीच्या आईने याबाबत पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आहे.
बलात्कारा हा गुन्हा काही महिन्यांपूर्वी घडला आहे. अल्पवयीन मुली गरोदर होती त्यामुळे हा गुन्हा इतके दिवस का समोर आला नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पीडित मुलगी देवळाली कॅम्प परिसरात राहते. अल्पवयीन मुलानेच या पीडितेवर लैंगिग अत्याचार केल्याचे सांगितले जात आहे. आता पीडितेने नवजात बाळाला जन्म दिल्याने ही घटना उघडकीस आली आहे.
Nashik Minor Girl Rape Crime Given Birth Baby