नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपनगर परिसरातील जय भवानी रोडवर मनसेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात रस्त्यावर पिंडदान करून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याची मागणी करण्यात आली. अनेक तक्रारी करून देखील मनपा प्रशासन लक्ष देत नसल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे मनसेच्या पदाधिका-यांनी सांगितले. यावेळी मनसैनिकांनी जोरदार घोषणाही दिल्या. या आंदोलनातून मनसेने पितृ पक्षात मनपाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले. या आंदोलनाला नागरिकांनी सुध्दा पाठींबा दिला.