नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जलशुध्दीकरण केंद्र आवारातील व्हॉल दुरुस्तीमुळे शुक्रवारी प्रभाग क्रंमाक १, ४, ५ व ६ मधील संपूर्ण भागात तसेच प्र. क्र. ३ मधील काही भागात शुक्रवार ५ ऑगस्ट रोजीचा दुपारचा, सायंकाळचा व शनिवार ६ ऑगस्ट रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तसेच शनिवार ६ ऑगस्टचा रोजीचा दुपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी निवेदनाव्दारे दिली.
या निवेदनात म्हटले आहे की, पंचवटी विभागाअंतर्गत पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र आवारातील ९०० मिमी व ५०० मिमी रॉ वाटर व्हॉल नादुरुस्त झाला आहे. सदरचे व्हॉलचे दुरुस्तीचे काम शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी हाती घेण्यात येणार असल्याने पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा प्रभाग क्रंमाक १, ४, ५ व ६ मधील संपूर्ण भागात तसेच प्र. क्र. ३ मधील काही भागात शुक्रवार ५ ऑगस्ट रोजीचा दुपारचा, सायंकाळचा व शनिवार ६ ऑगस्ट रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. तसेच शनिवार ६ ऑगस्टचा रोजीचा दुपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. याबाबत प्र. क्र १ मधील संपूर्ण म्हसरुळ परिसर, प्र क्र ४ व ५ मधील संपूर्ण मखमलाबाद रोड, पेठ रोड, दिंडोरी रोड, पंचवटी गावठाण परिसर तसेच प्र क्र ६ मधील संपूर्ण मखमलाबाद शिवार, रामवाडी, हनुमानवाडी परिसर तसेच प्र. क्र. ३ मधील हिरावाडी व लगतचा परिसर इत्यादी परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे.