सोमवार, जुलै 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

by Gautam Sancheti
जून 24, 2025 | 6:49 pm
in स्थानिक बातम्या
0
nal 11

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक शहरात एकीकडे गोदावरीला पूर असतांना दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे गेले दोन दिवस नागरिकांना पाणीपुरठा होऊ शकला नाही. त्यामागे नेमकं काय घडलं हे सुध्दा स्मार्ट नाशिकच्या अधिका-यांनी कळवले नाही. त्यामुळे सर्वत्र गोंधळ होता. आता मनापाने एक निवेदन देऊन त्यामागील कारणे सांगितली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, पाणी पुरवठा सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश निकम यांनी सांगितले की, मनपाचे विविध जलशुध्दीकरण केंद्र व बुस्टर पंपींग स्टेशन येथे नाशिक स्मार्ट सिटी कंपनी येथे विविध विकास कामे करणे चालू आहे. त्यानुसार नाशिक स्मार्ट सिटी कंपनी यांनी मनपाची विविध जलशुध्दीकरण केंद्रे येथे नवीन व्हॉल्व्स व फ्लो मीटर्स बसविणेचे कामाकरीता शटडाऊनची मागणी केली. सदर कामे करणेकरीता शनिवार २१ जून रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपावेतो शटडाऊन घेणेत आले होते. त्यामुळे मनपामार्फत काही देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आलेली होती. जुना गंगापुर रोड येथे पंपीग स्टेशनचे काम हाती घेतले असतांना रविवारी सकाळी ५.३० वाजेपर्यत सदर काम पुर्ण करण्यात आले. परंतु रविवारी सकाळी ९ वाजता सदर ठिकाणी पाईपलाईनला गळती सुरु असल्याचे निदर्शनास आले. पाईपलाईन मधील हवेमुळे Air Valve बंद होऊन पाईपलाईनमध्ये हवेचा दाब निर्माण होऊन पाईपलाईनला मोठयाप्रमाणात गळती सुरु असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाईपलाईन दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु करण्यात आले.

परंतु सदर काम मोठया स्वरुपाचे असल्याने रविवारी करण्यात आलेले प्रयत्न् अयशस्वी झाले होते. सोमवारी पुनश्च गंगापुर धरणाचे पंपींग पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला व सायंकाळी ४ वाजता सदर पाईपलाईन मधील पाण्याचा प्रवाह नियंत्रणात आणुन काम सुरु केले असता रात्री ११ वाजेपर्यंत काम पुर्ण करण्यात आले. सर्व जलशुध्दीकरण केंद्राचा आढावा घेतला व गंगापुर येथील पंपीग बंद करण्यात असता निलगीरी बाग जलशुध्दीकरण केंद्र येथील पाईपाईललाईनचा फ्लो १३०० m/hr कमी होऊन सकाळी ९ वाजेपर्यंत ९०० m/hr झाल्याने सर्व अभियंता यांना पंचवटी / नाशिक पश्चिम Air Valve तपासणी करणेबाबत सुचना दिल्या.

४ वाजता पुन:श्च Air Valve तपासणीच्या सुचना देण्यात आलेल्या असून गोदावरी नदीवरील पुलावर नव्याने Air Valve टाकण्याचे कार्यवाही युध्द पातळीवर सुरु आहे. सद्य: स्थितीत सर्व जलशुध्दीकरण केंद्रावरुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आलेला असून निलगीरी बाग जलशुध्दीकरण केंद्रावरील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. लवकरात लवकर सदर काम पूर्ण करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल. सदर बाबतीत दोन तीन दिवसात नागरीकांना पाणी पुरवठयाबाबत जो त्रास झाला त्याबददल् दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे. लवकरच पाणी पुरवठा सुरळीत करणेत येईल. तरी शहरातील सर्व नागरीकांनी व लोकप्रतीनीधींनी सहकार्य करावे असे आवाहनही केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

Next Post

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

ताज्या बातम्या

Untitled 55

शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट…अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहार प्रकरणाची पत्राव्दारे दिली माहिती

जुलै 28, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरुच…वेगवेगळ्या भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये अडीच लाखाचा ऐवज चोरीला

जुलै 28, 2025
Untitled 54

पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणारे दोन दहशवादी ठार

जुलै 28, 2025
rohini khadse e1712517931481

रोहिणी खडसे यांची पतीच्या अटकेवर २४ तासानंतर पहिली प्रतिक्रिया….

जुलै 28, 2025
Gw3d92jXUAErPq5

महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड

जुलै 28, 2025
cbi

सायबर फसवणूक करणाऱ्या संघटीत टोळीविरुद्ध सीबीआयची मोठी कारवाई ; तिघांना अटक

जुलै 28, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011