नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी गुणनियंत्रण विभागाला मंगळवारी अचानक भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी नाशिक शहरातील विविध विकासकामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासोबतच, गुणनियंत्रण विभाग कशा पद्धतीने कामकाज करते याची सविस्तर माहिती घेतली. तसेच प्राप्त नमुन्याची त्यांचा उपस्थितीत तपासणी केली.
विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी आयुक्त खत्री यांना सांगितले की, गुणनियंत्रण विभाग नाशिक शहरातील विविध सुरू असलेल्या स्थापत्य विकासकामांवर कडक लक्ष ठेवतो. विभागाच्या कामकाजाची मुख्य उद्दिष्टे म्हणजे विविध विकासकामांमध्ये जी बांधकाम साहित्य वापरण्यात येतात त्यांची क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त होणाऱ्या नमुन्यांची तपासणी करणे ती मानकांनुसार असल्याची खात्री करणे, तसेच शहरात सुरु असलेली स्थापत्य कामे गुणवत्ता पूर्वक करण्याची जबाबदारी ही क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी यांची असून ती अचानक भेट देवून तपासली जातात त्यात काही त्रुटी निदर्शनास आल्यास संबंधित कार्यकारी विभागला कळविल्या जातात त्या कार्यकारी विभागामार्फत त्याचे निराकरण केले जाते सुरू असलेली कामे नागरिकांना टिकाऊ आणि दर्जेदार गुणवत्ता पूर्वक असावी या दृष्टीने गुणनियंत्रण विभाग कार्यकारी विभाग व मक्तेदार यांनी केलीली कामे जनरल स्पेसिफिकेशन नुसार तपासणी केली जाते
आयुक्त मनिषा खत्री यांनी या प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली आणि विभागाच्या कार्यप्रणाली बाबत विविध प्रश्न गुंनियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांना विचारले. पाटील यांनी सांगितले की, विभागाच्या कामकाजामुळे शहरातील विविध पायाभूत सुविधा कामे गुणवत्ता मध्ये कोणतीही तडजोड न करता पार पाडून शहरातील नागरिकांना सर्वोत्तम सेवा मिळावी या करिता हा विभाग कामकाज करीत आहे.
आयुक्त मनिषा खत्री यांनी विभागाच्या गुणवत्ता प्रयत्नां मध्ये वाढ करून आणि अधिक कार्यक्षमतेने काम करण्यासाठी उपाययोजना करून कार्यकारी विभाग व मक्तेदार यांच्यावर अंकुश ठेवण्याच्या सूचना दिल्या.