इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गंगापुर धरण व मुकणे धरण १ फेब्रुवारीला पंपीग करता येणार नसल्याने दरम्यान मनपाचे सर्व जलशुध्दीकरण केंद्र बंद राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण नाशिक शहरास १ फेब्रुवारी रोजी संपूर्ण दिवस पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. शनिवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपावेतो शट डाऊन घेणेत येणार आहे. तसेच रविवार २ फेब्रुवारीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, याची नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
मनपाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणी पुरवठा विभाग मनपाचे गंगापुर धरण पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील १३२ के.व्ही. सातपुर व महिंद्रा या दोन फिडरवरुन ३३ के.व्ही. एच.टी. वीजपुरवठा घेणेत आलेला असून सदर पंपिंगद्वारे मनपाचे बाराबंगला, शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरीबाग, गांधीनगर व नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र यांना रॉ.वॉटरचा पुरवठा करणेत येतो. तसेच मनपाचे मुकणे रॉ.वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथुन एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी ३३ के.व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे.
१. गंगापुर धरण पंपिंग स्टेशन येथे M/S. JWIL Infra ltd, New Delhi यांचेमार्फत नविन बीपीटीचे काम चालु असून सदर कामात अडचणीचे ठरणा-या ३३ केव्ही ओव्हर हेड एच.टी. लाईनची महावितरण कंपनीचे उपस्थितीत शिफ्टींग करणे व त्याअनुषंगाने सबस्टेशन, पंप हाऊसमधील विद्युत विषयक कामे व इतर संबंधित कामे.
२. मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथील सबस्टेशन, पंप हाऊसमधील विद्युत विषयक कामे व इतर संबंधित कामे.
३. विविध जलशुध्दीकरण केंद्र येथील सबस्टेशनमधील कामे व स्मार्ट सिटी अंतर्गत शट डाऊन अंतर्गत फ्लो मीटर बसविणे व विविध कामे इ. मनपातर्फे नियोजित आहेत.
त्यामुळे गंगापुर धरण व मुकणे धरण येथुन सदर कालावधीत पंपीग करता येणार नसल्याने दरम्यान मनपाचे सर्व जलशुध्दीकरण केंद्र बंद राहणार असल्याने
संपुर्ण नाशिक शहरास दि.01/02/2025 रोजी संपुर्ण दिवस पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. सबब, शनिवार दि. 01/02/2025 रोजी सकाळी 09:00 ते
सायंकाळी 05:00 वाजेपावेतो शट डाऊन घेणेत येणार आहे. तसेच रविवार दि. 02/02/2025 रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे ही विनंती.