मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज येथील रेल्वे स्थानकात दुपारच्या सुमारास एक मोठी घटना घडली. एक माथेफिरु रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पत्र्याच्या शेडवर अचानकपणे चढला. त्याला खाली उतरविण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, त्याने अचानक धावत्या रेल्वेवर उडी घेतली.
प्लॅटफॉर्म नंबर दोनवर नवी दिल्ली-कर्नाटक एक्सप्रेस येत होती. त्याचवेळी माथेफिरुने रेल्वेवर उडी मारली. मात्र हा माथेफिरु ओव्हरहेड वायरला लटकला. त्यावेळी मोठा स्फोट झाला. त्यानंतर हा माथेफिरु रेल्वेगाडीच्या टपावर पडला. या प्रकारात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खाली उतरविण्यात आले. रेल्वे पोलिसांनी त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविले आहे. या सर्व गोंधळात रेल्वेला सुमारे अर्धा तास उशीर झाला. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1647627042907885575?s=20
Nashik Manmad Youth Jump on Running Railway