नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोकण कृषी पर्यटन विकास संस्थेने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवात गेली १६ वर्ष आंबा उत्पादक शेतकरी स्वताचा आंबा स्वता विकत आहे ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे असे मत नाशिकचे विभागाचे विभागीयआयुक्त श्री. राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केले.
नाशिक शहरातील त्रंबक नाका येथील पिनॅकल माॅल येथे कोकणच्या हापुस आंब्यांचा महोत्सव आयोजित केलेला आहे. हा महोत्सव १ मे पर्यंत सुरु राहणार असुन याठिकिणी नाशिककरांना नैसर्गिकरीत्यागवतात पिकवलेल्या हापुस आंब्या सोबतच निसर्गरम्य कोकणातील पर्यटन स्थळांची माहीती दिली जात आहे. तसेच आंबा , कोकम, काजू,फणस, करवंद या कोकणातील फळांपासून बनवलेले कोकण उत्पादनेही उपलब्ध आहे.
आधीच यंदा आंब्याचे कमी उत्पादन आहे व अवकाळी आलेला पाऊस यांनी आंबा बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला असूनही काही शेतकरी याठिकिणी उपस्थित आहेत त्यांना नाशिककरांनी भरभरुन प्रतिसाद द्यावा असे आवाहनही श्री.गमे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सौ. भारती गमे , कोकण कृषी पर्यटनचे श्री. संजय परब , दत्ता भालेराव , एग्रो प्राडक्टसचे निर्यातदार श्री. राजाराम सांगळे आदि उपस्थित होते.
Nashik Mango Festival Started Today