मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील टेहेरे गावात वानराच्या निधनानंतर संपूर्ण गावाने एकत्रित येत विधिवत पूजा करून अंत्यसंस्कार केलेत. अंत्यविधी करतांना अनेकांना अश्रू अनावर झाले. या वानराच्या अंत्यसंस्कार यात्राही गावातून काढण्यात आली व चक्क दहा दिवसांचा दुखवटा जाहीर केला.
गेल्या दहा वर्षापासन लंगूर जातीचा हा वानर गावात राहत असल्याने संपूर्ण गावाला त्याची सवयच झाली होती. गावकऱ्यांनी भरभरून जीव लावल्याने गावकऱ्यांकडून मिळालेल्या प्रेमाने जणू गावाचा तो रहिवाशीच झाला होता. अचानक त्याची तब्बेत बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर गावक-यांनी एकत्र येत त्याच्यावर रितसर अंत्यसंस्कार केले.
भूतदया पाळणाऱ्या या गावाने वानराप्रती दाखविलेले हे प्रेम सध्या राज्यभरातच चर्चेचा विषय ठरत आहे. वानराला माणसाप्रमाणेच दर्जा देणे आणि त्याच्यासाठी दुखवटा पाळण्याचा हा प्रकार आदर्शवत असल्याचे प्राणीप्रेमींनी म्हटले आहे. प्राणी असला तरी तो आपल्यातलाच जीव आहे. त्यामुळे त्यासाठी हे सर्व करणे आपले कर्तव्यच आहे. अनेकदा आपण ते करीत नाही. पण, टेहेरे ग्रामस्थांनी त्याची जाणिव ठेवली, असे सांगत सर्वत्र गावाचे कौतुकही केले जात आहे.
Nashik Malegaon Tehere Village Monkey Death Cremation