मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याच वाहनाला एका पिकअप वाहनाने कट मारत पळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडल्याने वाहनचालकासह मंत्री भुसेही अचंबित झाले. त्यानंतर भुसे यांनी त्या वाहनाचा पाठलाग करण्याचे वाहनचालकास सांगितले. अखेर त्या वाहनचालकाचा पाठलाग करण्यात आला.
अखेर त्या पिक अप वाहनाला रस्त्यावरच पकडले. त्यानंतर अतिशय़ धक्कादायक बाब समोर आली. त्या पिकअप वाहनातून अवैधरीत्या गोवंश वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. ही बाब बेकायदेशीर असल्याचे लक्षात येताच मंत्री भुसे यांनी हे वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले.
पालकमंत्री दादा भुसे हे आज ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होते. त्याचवेळी हा प्रकार घडला. दरम्यान, या घटनेमुळे अवैध गोवंश वाहतूकीचा प्रश्न पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. याप्रकरणी आता तरी सरकार कठोर कारवाई करेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मंत्री दादा भुसे यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. बघा हा व्हिडिओ
Nashik Malegaon Minister Vehicle Video Viral