मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक सुधाकर विश्वनाथ सोनवणे (वय ५४) हा २ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तसेच, एसीबीचे पथक अधिक तपास करीत आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा स्कीम) राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ठिबक सिंचनासाठी दोन जणांची निवड करण्यात आली होती. सदर योजनेच्या अटीनुसार दोन्ही लाभार्थ्यांनी त्यांच्या कुटुंबाचे शेतजमिनीवर फळबाग लागवड केली आहे. तसेच, तेथे ठिबक सिंचनाचे काम केलेलं आहे. सदर ठिबक सिंचनाचे कामाचे फाईलची तपासणी करणे, बिले ऑनलाईन अपलोड करणे यासाठी लाचखोर सोनवणे याने प्रत्येक फाईलचे 1000/- असे एकूण रुपये 2000/- एवढी लाच मागितली. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने सापळा रचला. आणि लाचखोर सोनवणे हा या सापळ्यात अडकला आहे. आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
*सापळा अधिकारी*
साधना भोये बेलगावकर, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
*सापळा पथक*
पो. हवा चंद्रशेखर मोरे पो. हवा. सचिन गोसावी.
पो. हवा. प्रफुल्ल माळी.
पो. ना विलास निकम.
पो ना संदीप बतिशे
पो. ना चां.परशुराम जाधव.
**मार्गदर्शक* –
**मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर* पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक
*मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक.
**मा.श्री. नरेंद्र पवार* वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक.
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.*
Nashik Malegaon Agri Dept ACB Raid Bribe Trap Corruption