मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा महिंद्रा इलेक्ट्रिकलचा प्रोजेक्ट नाशिक येथून पुणे येथे हलवण्यात आला आहे. यासंदर्भात आज आमदार देवयानी फरांदे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सदर विषय विधानसभेत उपस्थित केला. याबाबत उद्योगमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी त्यांनी केली. याबाबत स्पष्टीकरण देताना उद्योग मंत्री यांनी पुणे येथे महिंद्रा अँड महिंद्रा प्रकल्प सुरू करत असल्याची बाब खरी आहे असे सांगितले. परंतु हा प्रकल्प नाशिक येथून वर्ग न होता नाशिक येथे देखील महिंद्रा उद्योग समूह गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.
आज विधानसभेत आमदार देवयानी फरांदे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सदर विषय उपस्थित करताना नाशिक येथील विविध वृत्तपत्रातून उद्योग मंत्री यांच्या आदेशाने नाशिक महिंद्रा इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट पुणे येथे शिफ्ट होत असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. राज्याच्या माजी मंत्र्यांनी देखील याला दुसरा दिलेला आहे. तरी याबाबत माननीय उद्योगमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली. त्यानंतर उद्योगमंत्र्यांनी महिंद्रा कंपनी पुणे येथे गुंतवणूक करीत आहे. त्याच प्रमाणे नाशिक येथे देखील गुंतवणूक करणार असल्याचे स्पष्ट केले.
Nashik Mahindra Investment Industry Minister in Assembly