नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हयातील महायुतीचे जवळपास १३ नावे निश्चित झाली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीची नावे अद्याप समोर आलेली नाही. महायुतीमधून अजित पवार गटाचे ७ उमेदवार निश्चित झाले आहे. तर भाजपने ४ उमेदवारांची नावे घोषित केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे दोन उमेदवार निश्चित आहे. नाशिक मध्य व मालेगाव मध्य हे दोन विधानसभा मतदार संघात अद्याप उमेदवारी महायुतीने जाहीर केलेली नाही.
तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक पश्चिम मधून सुधाकर बडगुजर, निफाड – अनिल कदम, मालेगाव बाह्य – अव्दैय हिरे यांचे नाव निश्चित आहे. नाशिक जिल्हयात मालेगाव मध्य, चांदवड व इगतपुरी येथे काँग्रेसला जागा मिळणार आहे. तर नाशिक मध्य जागेवर वाद आहे. त्याचप्रमाणे इतर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गटाकडे जाणार आहे. फक्त कळवण विधानसभा मतदार संघ माकपच्या वाटयाला जाईल.
असे असेल विधानसभा उमेदवार
येवला – छगन भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार गट)
निफाड – दिलीप बनकर (राष्ट्रवादी अजित पवार गट) –
कळवण – नीतीन पवार (राष्ट्रवादी अजित पवार गट) –
सिन्नर – माणिकराव कोकाटे ( राष्ट्रवादी अजित पवार गट )-
दिंडोरी – नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी अजित पवार गट) –
देवळाली – सरोज आहिरे – प्रितम आढाव,
इगतपुरी – हिरामण खोसकर (अजित पवार गट) –
मालेगाव – दादा भुसे (शिवसेना शिंदे गट) –
नांदगाव – सुहास कांदे (शिवसेना शिंदे गट) –
नाशिक पूर्व – अॅड राहुल ढिकले ( भाजप) –
नाशिक मध्य – …….
नाशिक पश्चिम – सीमा हिरे (भाजप) –
सटाणा – दिलीप बोरसे (भाजप) –
चांदवड – डॅा. राहुल आहेर (भाजप) –
मालेगाव – ……….