बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक शहरात विविध ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने वीज पुरवठा प्रभावित

by India Darpan
मे 20, 2025 | 8:20 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250520 WA0437 e1747752574351

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मंगळवारी सायंकाळी आकस्मिक आलेला पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे नाशिक शहरातील अनेक भागात मोठी झाडे थेट विद्युत वाहिन्यांवर उन्मळून पडल्याने व झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून विद्युत तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. यंत्रणेवर पडलेली झाडे बाजूला करून व फांद्या बाजूला काढून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी दुरुस्ती करीत महावितरणचे अभियंते जनमित्र व कर्मचारी कार्यरत आहेत.
यामध्ये नाशिक जिल्हा रुग्णालय विद्युत उपकेंद्रात असलेल्या आवारात झाड कोसळल्याने संपूर्ण विद्युत उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला असून दुरुस्तीचे कार्य गतीने सुरू आहे.

यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, गोल्फ क्लब, रविवार कारंजा, चांडक सर्कल, मुंबई नाका या भागाचा वीज पुरवठा प्रभावीत झाला आहे. यासोबतच घारपुरे घाट येथे सुद्धा ११केव्ही अशोक स्तंभ या विद्युत वाहिनीवर झाड पडले आहे. पंचवटी पोलीस स्टेशन समोर म्हसोबा मंदिर समोर झाड पडले असून त्यामुळे सिंहस्थ,रविवार कारंजा आणि पंचवटी या विद्युत वाहिन्यावरील वीज पुरवठा बंद झाला आहे.

तसेच म्हसरूळ उपकेंद्रातील दिंडोरी रोडवरील एकता नगर , गोविंद नगर मधील सद्गुरु नगर , सातपूर एमआयडीसी मधील नाइस एरिया आणि कॉलेज रोडवरील विशाल पॉईंट जवळ विद्युत यंत्रणेवर झाड पडल्याने गंगापूर रोडवरील वीज पुरवठा बंद झाला आहे. तसेच गंगापूर रोडवरील बळवंत नगर, मखमलाबाद, चांदशी गाव येथे सुद्धा झाडे पडल्याने वीज पुरवठा प्रभावित झाला आहे. झाडे आणि फांद्या बाजूला करीत दुरुस्ती करून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अभियंते व जनमित्र कार्यरत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली ही मागणी…

Next Post

या व्यक्तींनी किरकोळ कारणावरून वादविवाद टाळावे, जाणून घ्या, बुधवार, २१ मेचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी किरकोळ कारणावरून वादविवाद टाळावे, जाणून घ्या, बुधवार, २१ मेचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

जून 18, 2025
IMG 20250617 WA0334 1

कुंभमेळा प्राधिकरणाची पहिली बैठक संपन्न…अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या या सूचना

जून 18, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011