नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जुने नाशिक परिसरातील टाकळी रोड भागात राजरोसपणे वीज चोरी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. वीज कंपनीच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात तीन ठिकाणी विज चोरीचा प्रकार पुढे आला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
टाकळीरोड भागात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याची माहिती कंपनीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिलकुमार तिवारी यांच्या पथकाने छापे टाकले असता शिवनेरी झोपडपट्टीतील शेख दबीर पापामिया,शोएब दबीर शेख व रमीज दबीर शेख आदी गेल्या वर्षभरापासून वीज चोरी करीत असल्याचे पुढे आले.
संशयितांनी सुमारे २६ हजार ६०० रूपये किमतीच्या १०८८ युनिटवीजेची चोरी केल्याचे निदर्शनास आले. दुसरी कारवाई कठडा भागात करण्यात आली परवीन मसुद खान कसुर यांनी वर्षभरात २०१८ युनिटची चोरी केल्याचे स्पष्ट झाले. तर याच भागातील कामरूद्दीन फकरूद्दीन कुरेशी यानी २१७९ युनिटची चोरी करून महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केल्याचे पुढे आले. संबधीताविरोधात विद्यूत कायद्यान्वये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार महाले करीत आहेत.