नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 119 व्या सत्राचा दीक्षांत संचालन सोहळा सध्या सुरू आहे. पोलीस अकादमीतील मुख्य कवायत मैदानावर हा समारंभ सुरू आहे. या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृह राज्यमंत्री शहरे सतेज पाटील, गृह राज्यमंत्री ग्रामीण शंभुराज देसाई आदी मान्यवर उपस्थित आहेत.
बघा या समारंभाचे थेट प्रक्षेपण