नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिका कर्मचारी यांना सन २०२४-२५ करिता दीपावली सणानिमित्त सानुग्रह अनुदान देणे बाबतचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत विविध कर्मचारी संघटनांनी २५ ते ३० हजार पर्यंत सानुग्रह अनुदान मिळण्याकरिता मागणी केलेली आहे.
सर्व संघटनांच्या मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करून तसेच, मनपाच्या आर्थिक बाबींचा विचार करून सन २०२२-२३ मधील १५ हजार रुपये यामध्ये रुपये २ हजार रुपये (साधारणतः ११.३३ टक्के वाढ) करून मागील वर्षी १७ हजार रुपये देण्यात आले होते.
यामध्ये २०२४-२५ या चालू वर्षी १७ हजार मध्ये ३ हजाराची वाढ करून (साधारणपणे १७.५ टक्के वाढ ) एवढी भरीव वाढ करून रक्कम रुपये २० हजार व शासन अनुदानातून वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना १० हजार सानुग्रह अनुदान देण्याबाबत आयुक्तांनी निर्णय घेतला आहे.