मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय महानुभाव संमेलन, नाशिक येथे सोमवार दिनांक 29 ते बुधवार दिनांक 31 ऑगस्ट 2022 असे तीन दिवस श्री चक्रधरनगर डोंगरे वस्तीगृह मैदान, गंगापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात तीन दिवस विविध धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम होणार आहेत.
श्री चक्रधर स्वामी यांचे विचार समाजातील सर्व स्तरांत पोहोचण्यासाठी महानुभाव पंथातील सर्व संत, महंत आजच्या काळात प्रयत्न करीत आहेत. त्या काळात म्हणजे सुमारे आठ शतकापूर्वी श्री चक्रधर स्वामी यांनी आपल्या शिष्य आणि भक्तांना अनेक विषयावर निरूपण केले. सकाळ, दुपार, सायंकाळ असे त्रिकाळ हे निरूपण चालायचे. यावेळी नागदेव, बाईसा, महदाइसा, दादोस असा शिष्य परिवार सोबत असे. या निरूपणात सूत्रे, दृष्टांत, कथा, संवाद, नाट्य असे विविध रंग असत. यासाठी कौशल्य, नाट्यअभिनय, समर्थक दृष्टांत आणि प्रवाही निवेदन यांनी युक्त अशा निरुपणामधून जीवनदर्शन घडते.
सध्या नाशिक जिल्हा निवासी साधक, संत व भक्त परिवाराच्या प्रयत्नातून भगवान श्री चक्रधर स्वामींच्या अष्टशताब्दी जन्मोत्सव अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचे देशपातळीवर आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमात भगवान श्री चक्रधर स्वामींच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या गंगा गोदावरीच्या नदीपात्रातील ‘ढगातळी आसन ‘ या स्थानावरील मंदिराचा उद्घाटन समारंभ देखील या निमित्त संपन्न होणार आहे.
या निमित्ताने धर्मसभा, संत महंतांची मिरवणूक व शोभायात्रा, भजन, कीर्तन, कथाकथन, प्राचीन, काव्यवाचन, कवी संमेलन व स्वामींच्या तत्त्वज्ञानावर चर्चा आणि मार्गदर्शनाचे आयोजन केलेले आहे. या संमेलनास संपूर्ण देशभरातून संत, महंत, भिक्षुक, वासनिक, साहित्यिक, लेखक, कवी व साधक वृंद उपस्थित राहणार आहेत. महानुभाव पंथातील आचार्य गणांची तसेच त्यांच्या जेवणाच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी सभा व मंडपाच्या शेजारीच विशेष मंडप उभारण्यात आला असून तेथे रात्रंदिवस भोजन कक्षात वेगवेगळे पदार्थ तयार करण्याचे काम सुरू आहे. भोजनामध्ये बुंदी, शिरा, पुलाव यासारख्या मिष्ठान्न चा समावेश असून त्याचबरोबर काही दानशूर व्यक्ती आपापल्या परीने या भोजन व्यवस्थेसाठी मदत करत आहेत, तर दुसरीकडे मुख्य मंडपात स्टेजवर संत, महंतांची असं व्यवस्था करण्यात येत असून याच ठिकाणी एक देवाचे मंदिर तथा देवपूजा साकारण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे उपस्थित राहणाऱ्या हजारो लाखो भाविकांसाठी भव्य सभामंडप उभारण्यात आला असून यामध्ये खुर्च्यांची असं व्यवस्था करण्यात येत आहे त्याचप्रमाणे पंथाचे पांढरे ध्वज बॅनर फ्लेक्स फलक आधी उभारण्याचे काम उद्धव पातळीवर सुरू आहे यासाठी कर्मचारी तसेच भाविक आणि पदाधिकारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत या संमेलनप्रसंगी महानुभाव पंथातील प्रमुख आचार्य तथा महंत उपस्थित राहणार आहेत, यात प.पू.प.म.श्री.बिडकर बाबा, प.पू.प.म.श्री.लोणारकर बाबा, प.पू.प.म.श्री.खामणीकर बाबा, प.पू.प.म.श्री. विध्दांस बाबा, प.पू.प.म.श्री. कारंजेकर बाबा, प.पू.प.म.श्री. लासुरकर बाबा या सर्वांची आपल्या शिष्यांसह वंदनीय उपस्थिती लाभणार आहे. या संमेलनासाठी उपस्थित राहणारे सर्व आचार्य गण संत महंत मानवा पंथातील तत्त्वज्ञान तसेच महानुभाव पंथातील मराठीचे स्थान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सुमारे आठशे वर्षांपूर्वी श्री चक्रधर स्वामी यांच्या काळात ज्ञानभाषा ही संस्कृत मानली जात होती. परंतु सर्व परंपरा मोडीत स्वामींनी मराठीचा उपयोग केला म्हणून ही गोष्ट धर्म – पंथ अभ्यासक आणि मराठी संशोधकांना देखील क्रांतिकारी वाटते.
मराठी त्या काळातील सर्वसामान्य जनतेची नित्याची बोलीभाषा होती. सर्वसामान्य जनतेला धर्मज्ञानाचा बोध व्हावा, हा त्यामागचा सामाजिक दृष्टिकोन होता. जनतेच्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी जनतेच्याच भाषेचा उपयोग करायला हवा, हे स्वामींचे धोरण होते. हा धर्मोपदेश कर्मकांडाविरुद्ध होता. साध्या सोप्या भक्ती मार्गाचा होता. धर्म-उपदेश ही भक्तीची आनंद यात्रा आहे, सर्वच काळात विश्वात शांतता असावी, असे वाटत असेल, तर अगोदर मनुष्य शांत असणे आवश्यक आहे. अत्यंत भौतिक सुखाच्या मागे धावणारा मनुष्य हा अनेक व्याधी जडून आत्मसुख हरवून बसतो.
व्यवहारिक शिस्त आणि संबंधात खऱ्या सुखा-समाधानाला आणि मनःशांतीला पारखा होतो. आज स्वार्थ, सत्ता, राक्षसी महत्त्वाकांक्षा यांच्या वातावरणात सारे विश्व असंतुष्ट झाले आहे. विश्वशांती करिता स्वातंत्र्य, समता, समभाव, मानवता, स्त्री-पुरुष समानता, एकनिष्ठ भक्ती हे श्री चक्रधर स्वामी यांनी निरुपित केलेल्या तत्वज्ञानाचे स्वरूप स्थूलमानाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. यातील ठळक वैशिष्ट्ये अशी सांगता येतील : श्री चक्रधर स्वामी यांचे तत्वज्ञान द्वैती असून सत्य, सनातन धर्माचे आहे. हे तत्वज्ञान म्हणजे भगवान श्री कृष्णांनी श्रीमद्भगवद्गीतेचे सांगितलेले तत्त्वज्ञान आहे. यात परमेश्वराचे ज्ञान प्राप्त होण्यास देवता शास्त्र व्यर्थ आहे.
ब्रह्मविद्या शास्त्र हेच मोक्षदायक आहे. या तत्वज्ञानात ज्ञान व भक्ती यांचा समन्वय साधलेला आहे. स्त्री-पुरुष आदींना संन्यास घेण्याचा अधिकार व स्वातंत्र्य आहे. तसेच परमेश्वराची उपासना सर्वश्रेष्ठ आणि कल्याणकारी आहे. यासह विविध धार्मिक विशेषता मानव पंथातील विविध विषय आणि तत्त्वज्ञानावर याप्रसंगी चर्चा होणार आहे. या संमेलनाच्या समारोपप्रसंगी राज्यातील प्रमुख राजकीय नामदार व मान्यवरांची उपस्थिती :या संमेलनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार श्री. एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), मा.ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ) यांच्यासह केंद्रीय मंत्री राज्यातील विविध खात्यांचे मंत्री तसेच माजी मंत्री भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे महानुभाव पंथा बद्दल सर्व सामान्य जनतेला माहिती व्हावी, त्याचा प्रचार प्रसार व्हावा, अभ्यास व्हावा, परिसंवाद घडावेत, यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, हीच या मागची प्रमुख भूमिका आणि उद्देश आहे. या संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून डोंगरे वस्तीगृहावर भव्य डोम उभारण्यात येत आहे. या संमेलनानिमित्त विविध धार्मिक वस्तूंचे स्टॉल तसेच धार्मिक पुस्तकांचे स्टॉल आणि पूजेच्या साहित्याची दुकाने देखील थाटण्यात येणार आहेत.त्याचप्रमाणे या संमेलनासाठी केवळ राज्यातून नव्हे तर देशभरातून महानुभाव पंथाचे अनेक संत, महंत, वासनिक, उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था शहरातील विविध लॉन्स मध्ये करण्यात आली आहे.
तसेच विविध समित्यांचे कामकाज युद्ध पातळीवर सुरू आहे या संमेलनासाठी येणाऱ्या संत महंतांची व्यवस्था या संमेलनासाठी येणारे संत, महंत, महिला तपस्विनी, साधू नामधारक वासनिक, भिक्षुक तसेच साहित्यिक व परराज्यातील महंत यांची व्यवस्था शहरातील चोपडा लॉन्स, राका गार्डन, श्रद्धा लॉन्स, पंचकृष्ण लॉन्स, पंचकृष्ण लॉन्स, लक्ष्मी विजय लॉन्स, शासकीय गेस्ट हाऊस, लक्ष्मी लॉन्स, सुदर्शन लॉन्स येथे करण्यात आली आहे. भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय महानुभाव संमेलनात तीन दिवस विविध धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम होणार आहेत. नाशिक जिल्हा निवासी साधक, संत व भक्त परिवाराच्या प्रयत्नातून या संमेलनाचे देशपातळीवर आयोजन करण्यात आले आहे.
अखिल भारतीय महानुभाव संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन या समारंभाचे मार्गदर्शक – प. म. श्री. सुकेणेकर बाबा , प. म. श्री. चिरडे बाबा, म. श्री. कृष्णराज बाबा मराठे आयोजक व स्वागतोत्सुक – मा. आमदार बाळासाहेब सानप, मा. श्री. दिनकर अण्णा पाटील, मा. श्री. दत्ता नाना गायकवाड, मा. श्री. प्रकाश शेठ घुगे ( सचिव ), मा. श्री. प्रकाश शेठ ननावरे (खजिनदार ), प्रभाकर आप्पा भोजने, मा. श्री अरुण महानुभव मा. श्री. विश्वास का. नागरे आदींनी केली आहे. तसेच स्वागत समिती- मा. श्री. लक्ष्मणराव जायभावे. मा. श्री. भास्करराव गावित, मा. श्री. उदयभाऊ सांगळे, मा. श्री. सिताराम पाटील आंधळे, मा. श्री. अरुण सोनूपंत भोजने, मा. श्री. राजेंद्र जायभावे. मा श्री संजय सोनुपंत भोजने, मा. श्री. भास्करराव सोनवणे, मा. श्री. सागर शांतीलाल जैन, मा. श्री. नंदूभाऊ हांडे, मा. श्री. किरण वसंत मते, अमोल दिनकर पाटील, सुरेश नाना भोजने, राजेंद्र जायभावे, साहेबराव आव्हाड, किरण मते, मुकुंद बाविस्कर, सुरेश भाऊ डोळसे, अनिल जाधव, साहेबराव आव्हाड, रवी पेखळे, छबु नागरे, अमोल पाटील, शांताराम खांदवे, श्याम राजाराम कातोरे, प्रदीप वैद्य, किरण भडांगे, माजी सैनिक दिनकर रतन पवार, अनिल घुगे, वाल्मीक मोकळ, विकी भुजबळ, भगवान बारगजे, नितीन गायकवाड, बाळासाहेब जगताप, शरद पवार, कैलास शिंदे, विष्णू वैराळ, सचिन चौधरी सर्व समित्यांचे पदाधिकारी व सदस्य कार्यकर्ते आणि जिल्हा निवासी संत, महंत, जिल्हा निवासी तपस्विनी, यासह सर्व शिक्षुक, पुजारी, वासनिक, साहित्यिक, सद् भक्त पंथातील सर्व मंडळे संस्था व पदाधिकारी, आदी सहकार्य करीत आहेत.
Nashik Mahanubhav Sammelan Preperation