नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय पशुवैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ संजय शिंदे उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यात एकुण ८,९५,०५० गोवंशीय पशुधन असून लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यामध्ये वाढत असून सध्या जिल्ह्यामध्ये एकुण ४९ ईपी सेंटर मधून २५७ जनावरे बाधित झाली असून पशुवैद्यकामार्फत दैनंदिन उपचाराने ४६ पशुधन बरे झाले असून १३ पशुधनाची मरतूक झाली आहे व सध्या उपचारामध्ये १९८ जनावरे आहेत.
दररोज सदर आजारी जनावरांची संख्या वाढत असल्याने आज रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेवून सर्व क्षेत्रिय पशुधन विकास अधिकारी/ पशुधन पर्यवेक्षक यांना शनिवार पर्यंत १००% लसीकरण करण्यासाठी सूचना दिल्या, यासाठी तालुका स्तरावर शासकिय अधिकारी कर्मचारी व खाजगी पशुवैद्यकांची मदत घेवून टिम तयार करून लसिकरण मोहिम स्वरूपात राबविण्यासाठी सुचित केले.
तसेच सर्व पशुवैद्यकिय अधिकारी/कर्मचारी यांनी २४x७ मुख्यालयी उपस्थित राहून सर्व आजारी जनावरांना उपचार करण्याबाबत निर्देशित केले. सध्या जिल्ह्यामध्ये ७१% लसीकरण झालेले असून शनिवार पर्यंत पुणं १००% लसीकरण पुर्ण करण्या बाबत अधिकारी कर्मचारी यांना सांगण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने सदर रोगावर आटकाव करण्यासाठी आपली गोठे व गोठ्याचा परीसर स्वच्छ ठेवावा, आवश्यकतेनुसार गोठे फवारणी करण्यात यावी यासाठी माझा गोठा स्वच्छ गोठा ही माहिम सर्व ग्रामसेवक व पशुसंवर्धन अधिकारी/कर्मचारी यांनी संयुक्त विद्यमाने राबविण्यात यावी. जनावर आजारी होताच तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकाशी संपर्क करावा व त्यांच्या मार्गदर्शना नुसार औषधोपचार करावा. आजारी जनावरांना उबदार ठिकाणी, स्वच्छ जागेत बांधावे. जनावरांना स्वच्छ पाणी व मऊ लुसलुसीत खाद्य द्यावे. जनावरांच्या आहारामध्ये क्षार मिश्रणे व जिवनसत्वे ‘पुरक खाद्य म्हणून देण्यात यावी.
सर्व पशुपालकांना आपल्या जनावरांना लसिकरण करून सहकार्य करावे व आपल्या जिल्ह्यामध्ये सदर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही या बाबत खबरदारी घ्यावी. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी पशुपालकांना केले आहे.
Nashik Lumpi Skin Disease Animals ZP CEO
District Rural Zilha Parishad