नाशिक – लोकहितवादी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कालिदास कला मंदिरातील साहित्य संमेलनाच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा होऊन नवीन कार्यकारिणी सन २०२२ ते २०२३ या वर्षासाठी घोषित करण्यात आली.
सभेची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. सभेचे प्रास्ताविक मंडळाचे कार्याध्यक्ष मुकूंद कुलकर्णी यांनी केले. सुरुवातीला दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचप्रमाणे ज्या लोकांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. लोकहितवादी मंडळाची घटना आणि नियमावली ६५ वर्ष जुनी आहे. त्यात कालानुरुप बदल होणे अपेक्षित आहे. त्यात बदल करण्यासाठी घटनासमिती स्थापन करावी व कालानुरुप बदल करण्यात यावे, असा ठराव या बैठकीत संमत करण्यात आला. यासाठी विशेष सभा बोलविली जावी, असे मंडळाचे विश्वस्त रमेश देशमुख यांनी सांगितले. यानंतर लोकहितवादी मंडळाच्या अध्यक्षपदी जयप्रकाश जातेगावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जातेगावकर यांनी कार्यकारिणीच्या सदस्यांची घोषणा केली.
मंडळाची नवी कार्यकारिणी अशी
अध्यक्ष
जयप्रकाश जातेगांवकर
कार्यकारी सदस्य
मुकुंद कुलकर्णी
भगवान हिरे
सी.एल. कुलकर्णी
सुभाष पाटिल
चंद्रक़ांत दिक्षीत
किरण समेळ
सुनील भुरे
फणिंद्र मंडलिक
संजय करंजकर
डॉ शंकर बोऱ्हाडे
अपूर्वा शौचे
मुक्ता बालीगा
सागर संत
सागर पाटील